गोकाक मतदार संघात चुरशीची तिरंगी लढत होणार असून येथील लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.गोकाकची निवडणूक राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरणार आहे.गोककमध्ये भाजपतर्फे रमेश जारकीहोळी,काँग्रेसतर्फे लखन जारकीहोळी आणि निजदतर्फे अशोक पुजारी यांनी अर्ज दाखल केले आहेत.
यापूर्वी दोन वेळा निवडणूक लढवलेल्या अशोक पुजारी यांच्या मतांच्या संख्येत चांगली वाढ झाली आहे.मागील वेळी रमेश जारकीहोळी यांना अशोक पुजारी यांनी घाम फोडला होता.आता लखन आणि रमेश यांनी तर आपले सर्वस्व पणाला लावले आहे.
दिवस जातील तसे गोककमधील वातावरण तापत जाणार आहे.त्यामुळे गोककमध्ये काय होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.अशोक पुजारी यांच्यासाठी माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी,माजी पंतप्रधान देवेगौडा आपली ताकद लावणार आहेत.
तिरंगी लढतीमुळे गोकाक विधानसभा मतदारसंघात वेगळं ट्विस्ट आलं असून भाजप मध्ये गेलेल्या रमेश जारकीहोळी यांना ही निवडणूक सोपी जाईल असं बोललं जातं असताना अशोक पुजारी यांनी निजद मधून उमेदवारी घेतल्याने आता चुरस निर्माण झाली आहे.अशोक पुजारी हे स्वतः दोन्ही जारकीहोळी बंधूंना टक्कर देत बाजी मारतात की काँग्रेसच्या लखन जारकीहोळी यांना त्यांच्या उमेदवारी मुळे वोट बँक वाढवण्यात कितपत मदत होते? ते रमेश यांचा गोकाक मधील अशवमेघ रोखतात का हे पाहावे लागेल.