रेल्वे ओव्हरब्रिजची उभारणी होऊन केवळ अकरा महिने उलटले आहेत पण ब्रिजवरील रस्ता खचणे,फुटपाथवर अवैध व्यवसाय चालणे,अस्वच्छता आदी तक्रारी जनतेने रेल्वेमंत्री सुरेश अंगडी यांच्याकडे केल्या होत्या.
त्याची दखल घेऊन अंगडी यांनी आमदार अनिल बेनके यांना रेल्वे ओव्हरब्रिजची पाहणी करून आवश्यक त्या उपययोजना करण्याची सूचना केली होती.आमदार अनिल बेनके यांनी ओव्हरब्रिजची फिरून पाहणी केली.
यावेळी त्यांना अस्वच्छता,खड्डे,पथदीप बंद असल्याचे समजले,फुलझाडे लावून सुशोभीकरण करण्याच्या जागेत जंगल वाढलेले आढळले.हे पाहून अनिल बेनके यांनी महानगरपालिका आयुक्त,रेल्वेचे व्यवस्थापक,विद्युत खात्याचे अधिकारी यांच्याशीं रेल्वे ओव्हरब्रिज वरून संपर्क साधून खड्डेबुजविणे,फुलझाडे लावणे,पथदीप सुरू करणे,स्वच्छता राखणे आदी सूचना केल्या.ओव्हरब्रिजचे काम दर्जेदार झाले नसल्यामुळे वारंवार खड्डे पडणे,रस्ता खचणे आदी प्रकार घडत आहेत.
गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात गोगटे सर्कल उड्डाण पुलाचे घोडसाईने उदघाटन झाले होते कामाचा दर्जा इतका चांगला नव्हता लोक प्रतिनिधींनी गडबड केल्याने ब्रिजची अवस्था बिकट झाली आहे.अनेकदा ब्रिज दुरुस्त करावा लागत आहे इतकेच कायतर सध्या ब्रिज दीड फूट खचला आहे.इंग्रजांच्या बनवलेल्या ब्रिजची आणि या ब्रिजची तुलना होऊ लागली आहे हा ब्रिज लवकर कोसळणार अशी भावना वाहन चालकांतुन व्यक्त होत आहे.