बाहेरील बकरी खरेदीदारांची बेळगाव परिसरातील मार्केट मध्ये होणारी खरेदी, यामुळेच स्थानिक मटण विक्रेत्यांना बकरी महागात मिळत आहेत परिणाम म्हणून बेळगाव शहरातील मटणाचा दर वाढला आहे अशी माहिती मटण वेल फेअर शॉप असोसिएशनचे अध्यक्ष उदय घोडके यांनी बेळगाव लाईव्ह शी बोलताना दिली.
बेळगाव परिसरातील मटण विक्रेते सुळेभावी बागेवाडी, कित्तुर, यरगट्टी, अमिनगड,विजापूर,मुधोल केरुर आदी बकरी मंडई तुन खरेदी करत असतात या मार्केटमध्ये आंध्रप्रदेश चेन्नई बंगळुरू महाराष्ट्र व्यापाऱ्यांनी मोठया प्रमाणात खरेदी सुरू केली आहे. मार्केट तेजी वाढवली आहे त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना देखील बकरी महागात खरेदी करावी लागताहेत परिणामी मटणाचे दर वाढले आहेत.
सध्या स्थितीत शहर परिसरात 540 ते 560 रू. प्रति किलो मटण विक्री केली जात आहे. त्यात काळीज आणि चरबी विरहित मटण 600 रु प्रमाणे विकले जात आहे. गुरुवारी सायंकाळी कन्नड साहित्य भवनात मटण वेल फेअर शॉप असोसिएशनची बैठक होणार आहे या बैठकीत 600 रु प्रति किलो दर केला जाण्याची शक्यता आहे.
बकऱ्यांच्या चमड्याच्या मटण विक्रेत्यांना यापूर्वी लाभ मिळत असे चामड्याचा दर 300 रुपये वरून 10 रुपयांवर आला आहे.चेन्नई जवळ अंगुर्ला येथील चमड्याचा कारखान्यात कपडे चपला बेल्ट आदी चमड्याच्या वस्तू तयार होत असतात या कारखान्यातील पाणी समुद्रा मिश्रित झाल्याने पाणी प्रदूषित होऊन मासे मरु लागले होते त्यामुळे तत्कालीन तमिळनाडू सरकारने चामड्याच कारखाना बंद केला आहे त्यामुळे बेळगावातून चमडे जायचे बंद झाले आहे या शिवाय बकऱ्यांच्या चमडयाची निर्यात देखील बंद झाली आहे .
चामड्याला खरेदीदार नाही म्हणून 300 रुपयाला विक्री होणारे चमडे 10रुपये झालेआहे याचा मोठा फटका मटण विक्रेत्यांना बसलाय अशी ही माहिती घोडके यांनी दिली.
यावर्षी झालेल्या अतिवृष्टीचा फटका देखील बकरी मार्केटला बसला आहे पुरामुळे चाऱ्याची कमतरता झाली अनेक बकरी पुरात वाहून गेलीअनेक दगावली आहेत हे देखील मटण महागण्याचे कारण आहे.