गोवा सरकारने गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर मद्यपान करण्यास बंदी घातली आहे.त्या संबंधी एक कायदा अमलात आणला आहे.दोन दिवसांपूर्वी बेळगावचे दोन तरुण गोव्यातील समुद्रात बुडून मृत झाल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे.गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही घोषणा केली.
जानेवारी महिन्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यास गोवा सरकारने बंदी घातली आहे.आता समुद्रकिनाऱ्यावर देखील मद्यपान करण्यास बंदी घातली आहे.समुद्रकिनाऱ्यावर पोलीस तैनात करण्यात येणार असून मद्यपान करणाऱ्या व्यक्तीला दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.
एकाहून अधिक व्यक्ती मद्यपान करत असतील तर दहा हजार रुपये दंड वसूल केला जाईल. बेळगावातील अनेक युवक गोव्याला मौज मजा करण्यासाठी जात असतात चोरला घाटातील बेळगाव गोवा सीमेवरील सुरल या गावात देखील दारू विक्रीवर बंदी गोवा सरकारने आणली होती.आता समुद्रकिनाऱ्या वर मद्यपान करण्यास बंदी आणली आहे.