बेळगाव जिल्ह्यात सध्या पीडिओच्या आदलाबदलीची मोठी खळबळ माजली आहे. जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी के वी राजेंद्र यांनी ग्राम विकास अधिकाऱ्यांच्या बदल्या करून भ्रष्टाचाराला खीळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. याच पार्श्वभूमीवर बेळगाव तालुक्यातील पाच ग्रामविकास अधिकार्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.
संगणक उतारे काढून दिल्याच्या आरोपावरून या पाच ग्रामविकास अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकारामुळे चांगलीच खळबळ माजली असून आणखी काही ग्रामविकास अधिकार्यांची निलंबित होणार असे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे आणखी दहा पीडीओ निलंबित होण्याची शक्यता आहे. यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे.
तालुक्यातील बहुतेक ग्राम विकास अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बाळेकुंद्री खुर्द येथील पुनम गाडगे यांनाही ही दोन महिन्यापूर्वीच निलंबित करण्यात आले होते. आता पुन्हा पाच पीडिओना निलंबित करण्यात आल्याने मोठी खळबळ माजली आहे. आणखी दहा पीडिओ निलंबित करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे ग्रामविकास अधिकाऱ्यांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे.
संगणक उतारामुळे मोठा भ्रष्टाचार झाला असून यामध्ये हे अनेक पीडिओनी कोट्यावधीची माया जमवल याची माहिती उपलब्ध झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी के वी राजेंद्र यांनी बदली बरोबरच निलंबनाच्या कारवाईला ही सुरुवात केल्याने मोठी खळबळ माजली आहे. त्यांच्या कारवाईचे अनेकातून समर्थन करण्यात येत असून समाधान व्यक्त करण्यात येत असली तरी ग्रामविकास अधिकार्यांची मात्र पाचावर धारण बसली आहे. त्यामुळे आणखी दहा पीडिओ सध्या हिटलिस्टवर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचे केव्हाही निलंबित होणार याची शक्यता नाकारता येत नाही.