गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामात पुढाकार घेतलेल्या फेसबुक फ्रेंड्स सर्कलने बस स्टँडवर रात्रीचा आश्रय घेणाऱ्या व्यक्तींना ब्लॅंकेट वितरण केले.गेल्या काही दिवसांपासून थंडीला सुरुवात झाली आहे.कुणाल राव कामले यांनी या कामी पुढाकार घेतला.
कुणाल यांच्याकडे काही व्यक्तींनी ब्लॅंकेटची आवश्यकता असल्याचे सांगितले होते.त्यानुसार कुणाल यांनी फेसबुक फ्रेंड्स सर्कलशी संपर्क साधून माहिती दिली.
संतोष दरेकर,शहाबुद्दीन बॉम्बेवाले,दिनेश कोल्हापूरे आणि सलीम बिस्ती यांनी ब्लॅंकेटची व्यवस्था केली.नंतर मार्केट पोलीस स्थानकाचे संगमेश शिवयोगी यांच्या हस्ते बस स्थानकावर रात्री थंडीत विना पांघरूण झोपलेल्या व्यक्तींना ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले.