ई एस आय हॉस्पिटल मधील बेजबाबदार कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.या हॉस्पिटलमध्ये उपचार गोविंद गवस यांना उपचार मिळाले नाहीत.
तसेच ई एस आय हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या हॉस्पिटलमध्ये देखील ई एस आय चे पत्र असूनही उपचार मिळाले नाहीत म्हणून गवस यांचा मुलगा सुरज ,माजी महापौर विजय मोरे आणि संतोष ममदापुर यांनी अशोक नगर येथील ई एस आय हॉस्पिटल समोर धरणे धरले.
यापूर्वी सूरज यांनी दहा हजार रुपये उपचारासाठी खर्च केले आहेत.त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने लवकरात लवकर गोविंद गवस यांच्यावर उपचार केले जावेत अशी मागणी होत आहे.