बी .एस.येडीयुरप्पा मार्ग अर्थात जुना पुणे बंगलोर रोड हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे.हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी करणारे निवेदन वकील अण्णा साहेब घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
जुने बेळगाव नाका ते अलारवाड क्रॉस पर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे .हलगा,बस्तवाड,अलारवाड, कोंडस्कोप, तारिहाळ गावातून दररोज अनेक जण बेळगावला नोकरी उद्योगासाठी येतात.विद्यार्थीही या गावातून मोठ्या संख्येने बेळगावला येतात.त्यामुळे या रस्त्याचा वापर त्यांना करावा लागतो.
या रस्त्यावर जागोजागी लहान मोठे खड्डे पडले असून त्यामुळे लहान सहान अपघात देखील घडत आहेत. यासाठी जुने बेळगाव नाका ते अलारवाड क्रॉस पर्यंतचा रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी जनतेने केली आहे.