कोसळलेले घर बांधण्यासाठी थेट लाभार्थीच्या खात्यावर पहिल्या हप्त्याची एक लाख रुपये रक्कम जमा करण्यात येत आहे.ही रक्कम मिळवून देण्यासाठी काही जण कमिशन मागत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.
कमिशन मागणाऱ्या व्यक्तीवर क्रिमिनल केस दाखल करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी एस.बी.बोमनहळ्ळी यांनी दिला आहे.
महापुराने नुकसान झालेल्या घराच्या मालकांना पंचनामे करून घर बांधण्यासाठीमुसळधार पावसामुळे घरे पडलेल्या कुटुंबांना सरकार घरे बांधण्यासाठी मदत देत असून पहिला हप्ता म्हणून
एक लाख रुपये थेट खात्यावर जमा करण्यात येत आहेत.ही रक्कम जमा करण्यासाठी काही जण कमिशन मागत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.
पूरग्रस्तांनी मदत मिळवण्यासाठी कोणालाही कमिशन देण्याची आवश्यकता नाही.कोणी कमिशन मागितल्यास थेट पोलीस स्थानकात जावून तक्रार नोंदवावी.तहसीलदार आणि तालुका पंचायत कार्यनिर्वाहाक अधिकारी यांनाही याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत असेही जिल्हाधिकाऱ्यांनी कळवले आहे.