रेल्वे खात्याने कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ला देसुर येथील लीजने दिलेली कंटेनर डेपोची जागा रिकामी करण्याचा आदेश दिला आहे. या जागेत रेल्वे खाते पी जी सी आय एल चे रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन केंद्र स्थापन करणार आहे.
रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनीही नैऋत्य रेल्वेला सांबरा नजीक विमानतळा जवळ कंटेनर डेपो आणि देसुर जवळ नवा रेल्वे कोच दुरुस्ती कक्ष उभारण्याच्या सूचना केल्या आहेत.
रेल्वे खाते आणखी 2000 कोटी रुपये गुंतवणूक करून रेल्वेला लागणारे साहित्य निर्यात करणारे अँसिलरी युनिट स्थापन करण्याचे नियोजन सुरू केले असून त्यासाठी कित्तुर येथे जागेची निवड केली जाणार आहे.