अडीच महिन्यापूर्वी सदाशिवनगर येथील घरफोडी करून ऐवज लंपास केलेल्या चोरट्याला ए पी एम सी पोलिसांनी गजाआड केलं आहे.
अब्दूलरशीद अब्दुलमजीद कैतांन शेख सध्या रा. मंडगाव गोवा, मूळ निवासी मुंदगोड याला अटक करून त्याच्या जवळील जवळपास अडीच लाखांचे दागिने जप्त केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अब्दुल रशीद याने भाग्यनगर टिळकवाडी येथील संदीप चौगुले वय 46 याला चोरी केलेले दागिने देऊन फरारी झाला होता ए पी एम सी पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी त्याला 29 नोव्हेंबर रोजी अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे.
14 सप्टेंबर रोजी सदाशिवनगर येथील तुकाराम संदीमनी या निवृत्त वन अधिकाऱ्यांच्या घर फोडी झाली होती त्याचा तपास अडीच महिन्यांनी लागला असून ए पी एम सी पोलिसांनी मुद्देमाला सह एकट्याला अटक केली आहे.