शहर आणि परिसरात कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्यांच्याकडे आता नसबंदी करण्यासाठी महानगरपालिकेने कानाडोळा केला आहे. यामुळे अनेक जण जखमी होण्याचे प्रकार वाढू लागले असून अनेक टोळके नागरिकांच्या अंगावर हल्ले करू लागले आहेत. तर रस्त्यावरून जाताना हल्लेही करू लागले आहेत. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून व्यक्त होत आहे.
शहर आणि परिसरात मोठ्याप्रमाणात कुत्र्यांची संख्या वाढल्याने अनेकांना रस्त्यावरून जाताना भीतीच्या छायेखाली राहावे लागत आहे. काही कुत्रे पिसाळलेले असल्याने धुमाकूळ घालत असून अनेकांचा चावाही घेतला आहे. यामध्ये लहान मुले जखमी होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. मात्र याकडे महानगरपालिकेने साफ दुर्लक्ष केले असून अनेकांच्या जीवाशी खेळण्यावर त्यांनी भर दिला आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
शहराबरोबरच ग्रामीण भागातही कुत्र्यांचे टोळक्याचा वाढता उच्छाद पाहून घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. कुत्री अचानकपणे हल्ला करून अनेकांना जखमी करू लागले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची गरज व्यक्त होत असून कुत्र्यांची जाती मात्र नागरिकांनी घेतली आहे.
रात्रीच्यावेळी उशिरा घराबाहेर पडल्यास कुत्र्यांचे झुंड अंगावर हल्ले करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे घराबाहेर पडणेही कठीण बनले आहे. एका टोळक्यात 15 ते 20 कुत्र्यांचा समावेश असल्याने अनेक लहान बालकावर विशेष करून ते हल्ले करत आहेत. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या कुत्र्यांची नसबंदी करावी व त्यांना जंगल परिसरात सोडून द्यावे अशी मागणी होत आहे.