बेळगाव सह सीमाभाग गेली 63 वर्षे कर्नाटकात अन्यायाने सामील केल्याच्या निषेधार्थ बेळगावातील मराठी जनतेकडून एक नोव्हेंबर काळा दिन म्हणून पाळला जातो.
काळ्या दिनाच्या निषेध फेरीचे वृत्तांकन प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया सोबत सोशल मीडियाने देखील जोरदार पणे केलं आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून बेळगाव प्रश्न काळ्या दिनानिमित्त देश भर पोहोचला आहे.बेळगाव Live ने देखील मूक सायकल फेरीचे अपडेट्स दिलेच आहेत.
आज दिवस भर सोशल मीडियावर विविध वृत्त वाहिन्या फेस बुक व्हाट्स अप्प व ट्विटर च्या माध्यमातून बातम्या प्रसारित करतच होत्या या व्यतिरिक्त युवा समितीच्या माध्यमातून ट्विट वर ट्रेंड चालवत बेळगाव प्रश्न देश भरात पोचवला गेला आहे.
सायंकाळी सहा ते रात्री 9 यावेळेत दिवस भरातील #बेळगावमहाराष्ट्राचे हा ट्रेंड चालवत आजच्या दिवशी तो देशात अव्वल ठरला आहे.दिवसभरात रात्री 9 वाजेपर्यंत 18 हजार लोकांनी ट्रेंड मध्ये सहभाग दर्शवला आहे.
राष्ट्रवादीचे नेते धनंजया मुंढे,विविध वर्तमानपत्रे सामना महाराष्ट्र टाईम्स आदी,चित्रपट निर्देशक रवी जाधव,अनेक आमदार खासदारांनी ट्विट करून या ट्रेंड मध्ये सहभाग दर्शवला आहे.
युवा समिती च्या वतीनं राबवण्यात आलेल्या या ट्रेंड मुळे पुन्हा एकदा बेळगाव प्रश्न देश पातळीवर गेला आहे दिवस भरात ट्विटर वर हॅश टॅग #बेळगावमहाराष्ट्राचेच यावर अनेकांनी आपली मते नोंदवली आहेत हा एक प्रकारे बेळगावतील युवा समितीचा सायबर विजय आहे.