बेळगाव ए पी एम सी मधले हे दुकान आता पर्यंत सर्वात महागडं दुकान ठरलं आहे .या दुकानासाठी चक्क एक कोटींची बोली लावून एका व्यापाऱ्याने सगळ्यांना अवाक केले.
मोहन मेणसे या व्यापाऱ्यांने बी-52 क्रमांकाच्या दुकानासाठी लिलावात तब्बल एक कोटी चार लाख 80 हजारांची बोली लावली .त्यामुळे बेळगाव ए पी एम सी मार्केट मधील B-52 हा गाळा सर्वात महागडा ठरला आहे. तर आजच्या लिलाव प्रक्रियेतील 36 लाख रुपये कमी बोली लागली आहे.
ए पी एम सी मधील व्होलसेल भाजी मार्केट मधील त्या 30 दुकानांचा लिलाव शुक्रवारी झाला. एकूण 30 दुकानासाठी 54 जणांनी लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला होता.ए मधील 6, बी मधील 13 गाळे लीजवर विक्रीसाठी तर सी मधील 11 गाळे प्रति महिना भाडे तत्वावर लिलाव करण्यात आले.
C मधील 11 गाळ्यांपैकी 43 हजार 500 रुपये प्रति महिना भाडे सर्वाधिक ठरले आहे.आजच्या लिलाव प्रक्रियेत अनेकांनी सत्तर लाख नववद लाख पर्यंत बोली लावत सहभाग घेतला होता.B-11 या गाळ्यासाठी चंद्रकांत कोंडुस्कर यांनी 98 लाख रुपये तर B-26 साठी संदीप जक्काने यांनी 76 लाख,B-22 साठी आपय्या चौगुले यांनी 74 लाख,B-10या दुकानासाठी मेहबूब कलमनी यांनी 68 लाखांची बोली लावली होती.
अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षित गाळे समान्यांना देऊ नये यावरून गोंधळ झाला होता.कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी हा लिलाव घेण्याचे दोन दिवसापूर्वी ए पी एम सीने ठरवले होते त्यानुसार पोलीस बंदोबस्तात ही लिलाव प्रक्रिया पार पडली आहे.