बेळगाव तालुक्यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेल्या आणि गुरफटलेल्या ग्राम विकास अधिकार्यांना निलंबनाची कारवाईला सामोरे जावे लागत आहे. यामुळे तालुक्यात जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.. बेळगाव तालुक्यातील आणखी दोन ग्रामविकास अधिकार्यांच्या निलंबित करण्यात आले आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील 5 व तालुक्यातील तेरा पिसीईओ यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आले आहे. आणखी काही जण हिटलिस्टवर आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात त्यांची नावेही जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्राम विकास अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटाच सुरू ठेवण्यात आला आहे. यामुळे मात्र तालुक्यातील जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बेकायदा ले-आऊट करणे उतारे देणे नाव नोंदणी करणे आधी गैर प्रकरणात गुरफटलेल्या ग्रामविकास अधिकार्यांवर कारवाई करण्यात आले आहे. अजूनही यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. याचा विचार करून आतापासूनच पीडिओची आमचीचांगलीच पंचाईत झाली आहे. तालुक्यात तेरा ग्राम विकास अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याने मोठी खळबळ माजली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के वी राजेंद्र यांनी एकूण जिल्ह्यातील 28 ग्राम विकास अधिकारी यांना नोटीस बजावली होती. त्यामधील आता तालुक्यातील 13 जणांना व जिल्ह्यातील पाच जणांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे निलंबनाच्या कारवाईचा धसका साऱ्यांनी घेतल्याचे दिसून येत आहे. अजूनही काहींची नावे हिटलिस्टवर असून त्यांचेही तातडीने निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. याचा विचार करून यापुढे तरी ग्रामविकास अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार न करता सुरळीत ग्रामपंचायतीचा कारभार चालवावा अशीच अपेक्षा सरांकडून व्यक्त होत आहे.