ग्रामीण भागातुन दररोज शाळा कॉलेजसाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना अनियमित बसचा फटका बसत आहे सदर बस सेवा नियमित करा या मागणीसाठी पश्चिम भागातील विविध गावच्या शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
सोमवारी दुपारी डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानातून शेकडो विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली.तब्बल एक तास हुन अधिक काळ डी सी ऑफिस समोर ठिय्या आंदोलन केलं.निवासी जिल्हाधिकारी बसवराज हटगुंडी यांनी निवेदन स्वीकार करून आश्वासन देण्याचा प्रयत्न केला मात्र संतप्त आंदोलकांनी वायव्य परिवाहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना बोलवून आश्वासन द्या अशी मागणी करत आंदोलन चालूच ठेवले शेवटी राज्य परिवाहन मंडळाच्या विभागीय नियंत्रण अधिकाऱ्यांनी निवेदन घेत आठ दिवसात बस नियमित करू असे आश्वासन दिले.
आगामी आठवडाभरात बेळगुंदी उचगाव कडोली आणि येळ्ळूर या ग्रामीण विभागात सायंकाळी चार ते सहा आणि सकाळी आठ ते दहा यावेळेतज्यादा बस सोडू असे आश्वासन देत ग्रामीण भागाला मोडक्या जुन्या बस सुरू करता असा आरोप केला असता जानेवारी महिन्यात नवीन बस येणार आहेत त्यावेळी नवीन बस सुरू करू असे आश्वासन देखील परिवाहन खात्याने दिले.
ग्रामीण भागातील अनियमित बस सेवेकडे लोक प्रतिनिधींनी दुर्लक्ष केलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा त्रास होत आहे वायव्य विभाग परिवाहन मंडळाने जर का आश्वासन देऊन देखील बस सेवा नियमित केली नाही तर गावागावात बस अडवू असा इशारा देण्यात आला.