गोगटे सर्कल रेल्वे ओव्हर ब्रिज बांधून एक वर्ष पूर्ण होत आहे मात्र त्याला लागलेली अवकळा काही कमी होत नाही या वर्षभरात तीन वेळा रेल्वेवर ब्रिज वरील रस्ता खचला आहे त्यामुळे कोट्यावधी निधी पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे रेल्वे प्रशासन याकडे लक्ष देणार काय असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
रेल्वे ब्रिज वरच्या दोन्ही बाजूने वाहतूकदारांना गचके बसताहेत या ब्रिज साठी 14 कोटी 36 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत अठरा महिन्यात हे काम पूर्ण करण्यात आले असले तरी केवळ एक वर्षात याची दुरुस्ती मात्र तीन वेळा झाली आहे.यावर्षी पडलेल्या दमदार पावसामुळे रेल्वेवरील रस्ते खचले आहेत ते वारंवार खचत आहेत त्यामुळे रेल्वे ब्रिजच्या दोन्ही बाजूला खड्डे निर्माण होत असून त्यावर वारंवार दुरूस्तीचे मलमपट्टी करण्यात येत आहे मात्र यासाठी रेल्वे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले आहे.
25 डिसेंबर 2018 रोजी या फुलाचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले मात्र त्यानंतर या पूर्णपणे रेल्वे प्रशासनाने आणि संबंधित लोकप्रतिनिधीने साफ दुर्लक्ष केले आहे त्यामुळेच या फुलाचे खच्चीकरण सुरू आहे याचा विचार करून आमदार अनिल बेनके यांनी पाहणी केली मात्र सध्या रेल्वेमंत्री असणारे सुरेश अंगडी यांनी व्यस्त कामात याकडे दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे या पुलावरून प्रवास करताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
एक वर्षात चार वेळा पुलावरील रस्ता खचला आहे त्यावर वारंवार डागडुजी करण्यात येत आहे मात्र या पुलाचे काम योग्यरित्या झाली नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.जुने रेल्वेवर ब्रिज ब्रिटिशकालीन होते ते शंभर वर्षाहून अधिक काळ टिकले मात्र नवीन रेल्वे वर्षभरातच चार वेळा दुरुस्ती झाल्याने नेमके किती वर्ष जगणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.