Monday, December 23, 2024

/

अकॅडमी ऑफ म्युझिक चा स्वरगंध

 belgaum

बेळगाव येथील सुप्रसिद्ध संगीत संस्था अकॅडमी ऑफ म्युझिक तर्फे वार्षिक स्वरगंध हा विविध मनोरंजनाचा कार्यक्रम आय एम आर च्या सभाग्रहात शनिवार दिनांक 16 रोजी पार पडला. यामध्ये सर्व प्रथम संस्थेच्या विद्यार्थ्यांनी गणेश स्तुती सादर करताना अमृतराय यांची’ कटाव’ही विशिष्ट रचना, जी सुप्रसिद्ध संगीतज्ञ डॉ.अशोक दा. रानडे यांनी सर्व बारा स्वरांमधे आणि “ताल आडाचौताल”मधे निबद्ध केली असून , मुलांनीही समर्थपणे सादर केली.

त्यानंतर समूह गीते देशभक्ती गीते नाड गीते तसेच संवादिनी सह वादन शास्त्रीय गायन जुगलबंदी आणि आणि सर्वात शेवटी गणेश स्तुती परण आणि द्रुपद गायनाचं सादरीकरण यांच्या माध्यमातून अप्रतिम रित्या प्रस्तुत केले यामध्ये सारंग कुलकर्णी, तन्मयी सराफ, रंजीता पर्वती कर, राज बिचु, हे प्रमुख गायक आणि धनश्री, श्वेता, पावनी आणि मधुरा या सह गायिकांनी तालाची पढंत म्हटली. श्री अंगद देसाई यांची तबला साथ श्री स्नेहल जाधव यांची ऑक्टोपॅड तसेच अनुप हुद्दार याने सिंथेसाइजर आणि आणि सारंग यांनी संवादिनी साथ दिली ही पूड संकल्पना आणि त्याचे दिग्दर्शन श्री सारंग कुलकर्णी यांचे होते उत्तर उत्तर रंग जाणाऱ्या कार्यक्रमाला रसिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून भरभरून दाद दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध वकील डॉक्टर एस बी शेख आणि गुरुवर्य विजापूर मास्तरांच्या सुकन्या श्रीमती कुसुम कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून स्वर गंधाचे स्वरगंध उद्घाटन झाले.

Acadamy of music
Acadamy of music

संचालिका रोहिणी कुलकर्णी यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्राजक्ता बेडेकर, प्रणाली नातू आणि आणि भावना दातार यांनी केले. संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या दोन पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

डॉक्टर सुधांशू कुलकर्णी यांचे आईवडिल कै.श्री.रामचंद्र वामन कुलकर्णी आणि कै.श्रीमती लीला रा. कुलकर्णी ‘(संवादिनी वादन)’ स्मृती पुरस्कार मास्टर अनुप हुद्दार याला आणि श्रीमती रोहिणी कुलकर्णी यांचे आई-वडील कै.श्री.पांडुरंग नारायण जोशी आणि कै.श्रीमती सुलभा पां. जोशी,गोवा (शास्त्रीय गायन) स्मृती पुरस्कार कुमारी स्तुती कुलकर्णी हिला प्रदान करण्यात आला.

तसेच भाग घेतलेल्या भाग घेतलेल्या सर्व कलाकारांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाला श्री. चिदंबर तोरवी, अंगद देसाई यांची समर्थ तबला साथ आणि श्री.स्नेहल जाधव(ऑक्टोपॅड),अनुप हुद्दार, स्मृती चिकोडी यांनी संवादिनी आणि कीबोर्ड साथ संगत केली. कार्यक्रमाच्या शेवटी संचालिका सौ. रोहिणी कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.