एकीकडे स्मार्ट सिटीच्या नावाखाली व्हॅकसीन डेपो सारख्या परिसरात झाडांची कत्तल होत असताना शून्य फौंडेशनच्या माध्यमातून जुनी झाडे जगवण्याचे काम केले जात आहे.किरण निप्पाणीकर यांनी पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे सुरू केलेले कार्य कौतुकास्पद आहे.
बेळगावचे ट्री मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले किरण निपाणीकर यांच्या माध्यमातून हे पर्यावरण रक्षणाचे कार्य चालू आहे.150 वर्षे जुन्या पिंपळाला जीवनदान देण्याचे काम शून्य फौंडेशनने केलं आहे.
पावसाळ्यात कॅम्प भागात मोठा पिंपळ कोसळला होता. या वृक्षाला जीवनदान देण्यात आलं आहे.याचे पुनर रोपण खादरवाडी येथील ब्रह्मलिंग मंदिर परिसरात यशस्वी रित्या करण्यात आले आहे.
पिरनवाडी तलावात यशस्वी रित्या अनेक झाडांचे पुनर प्रत्यारोपण केल्या नंतर शून्य फौंडेशनने खादरवाडीत 74 व्या झाडाचे पुनररोपण केले कॅम्प मधून पिंपळ खादरवाडीत घेऊन गेल्यावर ग्रामस्थांनी पिंपळाचे स्वागत केलं त्या नंतर पूजन करून ब्रह्मलिंग मंदिर परिसरात पिंपळाचे पुनर रोपण केलं.ग्रामस्थ विद्यार्थ्यांनी देखील या कार्यक्रमात उपस्थिती होती.