जिल्हा पंचायतीत अनेक भ्रष्टाचार प्रकरणांची केवळ चौकशी सुरू आहे सगळे अहवाल येताहेत ही बाब जरी खरी असली तरी
राज्य सरकारच्या मुख्य सचिवांना देखील पत्र लिहिलेले आहे आगामी दहा दिवसांत निकृष्ट दर्जाच्या सायकल वितरण घोटाळ्यातील दोषींवर कारवाई होईल असा विश्वास जिल्हा पंचायत सी ई ओ राजेंद्र यांनी व्यक्त केला.
शुक्रवारी दुपारी जिल्हा पंचायत सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत पूर ग्रस्तांना देण्यात येणारी मदत आणि शिक्षण खात्याचे घोटाळे यावर सविस्तर चर्चा झाली.जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांनी निकृष्ट दर्जाचे शूज सायकल वितरण प्रकरणी 45 दिवस उलटले तरी अद्याप कुणावर कारवाई का झाली नाही असा प्रश्न उपस्थित केला असता सी ई ओ यांनी त्याला उत्तर देताना आगामी दहा दिवसांत कारवाईचे संकेत दिले.
सायकल वितरण घोटाळा असोत किंवा शूज इतर सर्व प्रकरणांची चौकशी सुरू आहे शिक्षण खात्याचे अतिरिक्त आयुक्तांना पत्र लिहून कारवाईची मागणी केलेली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.यावर्षीचे शूज का पूर्ण वितरित केले नाहीत शूज ऐवजी डुप्लिकेट ब्रँडेड सँडल वितरण केले आहेत याची चौकशी करण्याची मागणी गोरल यांनी केली असता जिल्हा पंचायत सदस्य बी ई ओ सहा जणांनी प्रत्येक शाळेला भेट देऊन सँडलची तपासणी करण्याचे आदेश सी ई ओ यांनी दिले.
सकाळी अकरा वाजता सुरू होणारी बैठक साडे बारा वाजता सुरू झाली मात्र 63 सदस्यांचा अपूर्ण कोरम अभावी अर्धा तास उशिरा चर्चा सुरू झाली.पुरग्रस्तांना वितरित करण्यात येणाऱ्या मदती बद्दल सविस्तर चर्चा या बैठकीत झाली. अधिकारी योग्य पूर ग्रस्तांना मदतनिधी उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरलेत असा आरोप सदस्यांनी केला त्यावर सी ई ओ यांनी घर पडलेल्याना ए बी सी असे प्रकार केले असून सर्व्हे करून मदत रक्कम देणार असल्याचे सांगितले.75 टक्के हुन अधिक घरांचे नुकसान झाले असेल तर पाच लाख मदत,25 ते 75 टक्के घरांचे नुकसान झाले एक लाख ,25 टक्क्यांहून कमी नुकसान झाल्यास 50 हजार रुपयांची मदत मिळेल असे सांगितले.