Friday, December 20, 2024

/

जि पं वरिष्ठ अधिकार्‍यामुळे नागरिक त्रस्त पीडिओ मस्त

 belgaum

जिल्हा पंचायतीच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांमुळे नागरिक पुरते त्रासले आहेत. मात्र याची चिंता न करता त्या अधिकाऱ्याने पीडिओना मस्त ठेवले आहे. त्यामुळे जिल्ह्यातून संतापाची लाट उसळत आहे. अशा प्रकाराकडे जिल्हा पंचायत चे मुख्य कार्यकारी अधिकारी के व्ही राजेंद्र लक्ष देणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

एका आमदार आणि माजी खासदाराचा पाहुणा असल्यामुळे मनमानी कारभाराला उत आला आहे. अशा अधिकाऱ्यांना वेळीचकारवाई झाली नाही तर तालुक्या बरोबरच जिल्ह्यात ही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होण्यास विलंब लागणार नाही अशी माहिती उपलब्ध झाली आहे. हा अधिकारी प्रत्येक व
पीडिओच्या बदली किंवा इतर कोणतेही काम असले तर मोबदला घेऊनच ती कमी करण्यावर भर देत आहे. यामुळे नागरिकांची दैना उडाली असून त्यांच्या कामाकडे मात्र दुर्लक्ष करण्यात येत आहे.

तालुक्यातील काही पीडिओनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याला हाताशी धरून आपली पोळी भाजून घेण्यावर भर दिला आहे. अनेक पीडिओना हाताशी धरून गैरकारभार ही करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे. अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील पीडीओची बदली असो वा त्यांचे इतर कोणतेही काम असो पैसे घेतल्याशिवाय संबंधित अधिकारी त्यांच्या कागदपत्रांना हातही लावत नाही अशी माहिती मिळाली आहे. तालुक्यातील रेंज नसणाऱ्या पीडिओ संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याचा उजवा हात असल्याची माहितीही उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या भोंगळ कारभाराला कधी आळा बसणार? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांतून केला जात आहे.

संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कोणतेही नागरिक कामासाठी गेले असता आज या उद्या या असे म्हणून बगल देण्यावरच भर दिला जात आहे. कोणताही तालुका पंचायत सदस्य असो वा जिल्हा पंचायत सदस्य संबंधित अधिकाऱ्यांनी गेल्यावर त्यांना कवडीमोल किंमत देण्यावर अधिकारी भर देत आहे. त्यामुळे सदस्य यांच्यातूनही संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय वरदहस्त लाभलेल्या संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यावर कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.