महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची व्यापक बैठक जत्तीमठ येथे रविवार 13 रोजी संपन्न झाली, बैठकीच्या अध्यक्ष स्थानी शुभम शेळके होते.यावेळी येणाऱ्या 1 नोव्हेंबर काळ्या दिनाची व्यापक जनजागृती करून युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि काळा दिन गांभीर्याने पाळावा असे आवाहन करण्यात आले.
तसेच युवा समिती मार्फत मराठी विध्यार्थी संघटना लवकरात लवकर सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा ना नफा ना तोटा या तत्वावर काळे t शर्ट काढण्यात येणार आहेत, लवकरच त्याची नोंदणी सुरू करण्यात येईल.
त्याचप्रमाणे किनये येथील मराठा मंडळ पी यु कॉलेज मध्ये यावर्षी जबरदस्ती 11 वी चा मराठी विषय आणि वर्ग बंद करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे, तर युवा समिती मार्फत संबंधित कॉलेज ला त्या संदर्भात लवकरच जाब विचारण्यात येईल असा निर्णय झाला.
यावेळी सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी प्रास्ताविक केले, तर कार्याध्यक्ष धनंजय पाटील, उपाध्यक्ष संतोष कृष्णाचे, भावेश बिरजे, रोहन लंगरकांडे, किरण धामणेकर, अभिजित मजुकर, सिद्धार्थ चौगुले, विशाल गौडाडकर, महांतेश कोळूचे, मनोज पाटील आदींनी आपले विचार मांडले, तसेच किशोर मराठे, विजय जाधव, किरण मोदगेकर,रोहित गोमानाचे,मंदार चौगुले,अजय सुतार,उत्तम कनबरकर,शशिकांत सडेकर, गणेश रेडेकर, विनायक मोरे,योगेश मोदगेकर, साईनाथ शिरोडकर अश्वजित चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.उद्या मंगळवारी दुपारी काळ्या दिना संदर्भात मध्यवर्ती समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे