अपेक्षे प्रमाणे येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुनर्रचनेत युवकांना संधी देण्यात आली आहे. रविवारी होनकल खानापूर येथे येळ्ळूर समितीचे चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले होते या ठिकाणी शेकडो येळ्ळूर वासीयांच्या उपस्थितीत येळ्ळूर विभाग समितीची पुनर्रचना करण्यात आली.
बेळगाव सीमाभागातील मराठी अस्मितेचा केंद्र बिंदू असणाऱ्या येळ्ळूर गावामध्ये जे पेरलं जातंय ते पूर्ण सीमा भागात उगवतंय असं म्हटलं जातं त्याप्रमाणे येळ्ळूर विभाग समिती प्रमाणे शहर तालुक्यातील सर्व समित्यानी युवकांना कार्यकारिणीत संधी देणारं आहेत का?हे पहावे लागणार आहे.अनेकदा माध्यमांनी टीका करून देखील समिती नेतृत्वाला जाग आली नव्हती अखेर युवा समितीच्या माध्यमातून युवकांनी कार्य सुरू केले आहे अश्या अनेक युवकांना मुख्य कार्यकारिणीत संधी देण्याची गरज आहे. काळ्या दिनाच्या पाश्र्वभूमीवर येळ्ळूर समितीने मुख्य कार्यकारिणीत अनेक युवकांना संधी दिल्याने भविष्यात लढ्याला बळकटी मिळेल यात शंका नाही.
येळ्ळूर विभाग समितीत जेष्ठ नेत्यांनी पद सोडली असून मोठ्या प्रमाणात युवकांचा भरणा झाला आहे विशेष म्हणजे 50 वर्षाच्या आतील आणि 24 वर्षा पेक्षा अधिक वयोगटातील अनेकांना संधी देण्यात आली आहे. येळ्ळूर समितीची कार्यकारिणी अशी असणार आहे.
अध्यक्ष:- शांताराम राणू कुगजी
कार्याध्यक्ष:- दुधाप्पा चांगापा बागेवाडी
उपाध्यक्ष:-1. राजू मारुती पावले
2.सतीश बाळकृष्ण पाटील
3.रमेश नारायण मेनसे
सेक्रेटरी:-. प्रकाश पांडुरंग अष्टेकर
उसेक्रेटरी:- शिवाजी शंकर कदम
खजिदार:- प्रकाश विष्णु पाटील
उपखजिनदार:- मधुसूदन महादेव पाटील
हिशोब तपासणी:-
1..अजित भरमांना पाटील
2..परशराम धकोजी घडी
3.सतीश मल्हारी देसुरकर
संपर्क प्रमुख:-
1.राजू पांडुरंग उघाडे
2..परशराम लक्ष्मण परीट
3.सुरज आनंद गोरल
4 .नागेश सुभाष बोबाटे
5..राकेश बाबुराव परीट
6.लक्ष्मण भरमांना मेलगे