लोखंडी सळीने डोक्यात घाव घालून पत्नीने पतीचा खून केल्याची खळबळजनक घटना वडगावमधील भुवनेश्वर नगर येथे घडली आहे .
किरण शिवाप्पा लोकरे (वय 26 वर्षे )राहणार भुवनेश्वर नगर वडगाव असे खून झालेल्या पतीचे नाव आहे .पतीचा खून केलेल्या पत्नी सविताला शहापूर पोलिसांनी अटक केली आहे.
किरण आणि सविता यांचा दोघांचाही तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता .दोघेही भुवनेश्वर नगर वडगाव चे रहिवासी असून दोघांची घरे समोरासमोर आहेत.या दोघांना दोन वर्षाचा अद्विक नावाचा लहान मुलगा असून आज शुक्रवारी दुपारी किरण हा आपल्या मुलाला बघायला म्हणून गेला होता त्यावेळी पती पत्नीमध्ये दोघात क्षुल्लक कारणामुळे वाद झाला. पत्नीने राग अनावर झाल्याने पतीच्या डोक्यात लोखंडी सळईने घाव घालून त्याचा खून केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किरण आणि सविता यांच्यात वरचेवर भांडणे होत होती. त्यामुळे ते वेगळे राहत होते .कविताही कामानिमित्त बेंगलोरला गेली होती. आणि शुक्रवारी दुपारी परतली होती .त्यामुळे आपल्या लहान मुलाला बघायला म्हणून किरण हा सविताच्या घरी गेला होता. त्यावेळी दोघात भांडण होऊन सविताने व सविताच्या भावाने मिळून लोखंडी सळीने घाव घालून पतीचा जीव घेतला.
किरण हा दारू पीत होता आणि पत्नीला कामाला जाऊ नकोस असे सांगत होता. सविता कामाला जात होती त्यामुळे वरचेवर दोघात भांडणे होत होती. शुक्रवारी दुपारी दोघात जोरदार भांडण झाले सविताने व किरणच्या मेेव्हण्यान खून केला.
दुपारी साडेतीनच्या दरम्यान ही घटना घडली दरम्यान घटनास्थळी शहापूर पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी यांनी पाहणी करून पंचनामा केला तर स्वतःच्या पतीचा खून करणाऱ्या सविता व मेव्हण्याला याला पोलिसांनी अटक केली आहे.