जिल्हा शिक्षणाधिकारी ए .बी.पुंडलिक यांनी जिल्हा पंचायत सीईओकडे बारा दिवसांची रजा मागितली होती पण सीईओ नी ही रजा मंजूर नामंजूर केली आहे.सायकली वितरण शूज वितरण सह अनेक भ्रष्टाचारांच्या आरोपांच्या विळख्यात असलेले डी डी पी आय यांनी18 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जिल्हा पंचायत बैठकीच्या तोंडावर मागितलेली रजा सी ई ओ राजेंद्रन यांनी नामंजूर केल्याने त्यांना बैठकीत होणाऱ्या आरोपाला उत्तरे द्यावीच लागणार आहेत.
सध्या पुरग्रस्तांचे मदत्त कार्य सुरू आहे त्यामुळे आपल्याला रजा देता येत नाही असे पत्र सीईओनी पुंडलिक यांना लिहिले आहे.विशेष म्हणजे १४ ते २५ अशी बारा दिवसांची रजा पुंडलिक यांनी मागितली होती आणि १८ ऑक्टोबर रोजी जिल्हा पंचायतीची विशेष बैठक होणार आहे.
मागच्या बैठकीत शिक्षण आणि स्थायी समिती अध्यक्ष रमेश गोरल यांच्यासह अन्य सदस्यांनी खराब सायकलींचे वितरण आणि अन्य विषयावरून पुंडलीक यांना धारेवर धरले होते.यावेळी नीट माहितीही पुंडलिक यांना देता आली नव्हती.पुढील बैठकीत सविस्तर माहिती देतो असे पुंडलिक यांनी बैठकीत सांगितले होते.पुंडलिक यांच्या कारभाराबद्दल सभागृहाने पत्र लिहून तक्रार केली होती.त्यामध्ये भ्रष्टाचार आणि अन्य विषय मांडले होते.त्याची दखल घेऊन सीईओ नी अपर शिक्षण आयुक्तांना पुंडलिक यांची चौकशी करण्यासंबंधी पत्र लिहिले आहे.
बूट वितरणात देखील सावळा गोंधळ झाला असून त्यालाही पुंडलिक जबाबदार आहेत असे सदस्यांचे मत आहे.त्यामुळे पुंडलिक यांना सगळे प्रकरण अंगलट येण्याची शक्यता आहे.बैठकीला दांडी मारण्यासाठीच पुंडलिक यांनी रजा मागितल्याची चर्चा जिल्हा पंचायत सदस्यात सुरू आहे.एकूण दि.१८ रोजी होणाऱ्या जिल्हा पंचायत बैठकीत पुंडलिक काय करतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा पंचायत स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल यांनी सायकली वितरण आणि शूज वितरण घोटाळा बाहेर काढत चौकशी लावली आहे.मागील बैठकीत प्रश्नांची सरबत्ती केली असता अभ्यास करून उत्तरे देतो असे सांगितलेले अधिकारी नेमकं सर्वसाधारण बैठकी अगोदर रजा का मागतात?अश्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराला वेसण घालण्याची गरज आहे अशी गोरल यांनी बेळगाव Live कडे बोलताना व्यक्त केली आहे.