प्लास्टिक मुक्त खेडे करण्यासाठी दहा गुंठे जागा असलेल्या ग्राम पंचायतींना सुक्या आणि ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी वीस लाख रू. चे अनुदान सरकरकडून देण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हा पंचायतीचे सी इ ओ के व्ही राजेंद्र यांनी केली.
शुक्रवारी जिल्हा पंचायत,तालुका पंचायत तर्फे तालुक्यातील ग्राम पंचायत अध्यक्ष,उपाध्यक्ष ,ग्रामीण पाणी पुरवठा आणि स्वच्छता समितीचे अध्यक्ष ,ग्राम विकास अधिकारी यांच्यासाठी स्वच्छ भारत योजने अंतर्गत एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी के व्ही राजेंद्र यांनी ही माहिती दिली.प्लास्टिक ची आणि कचऱ्याची विल्हेवाट लावून खेडी स्वच्छ ठेवण्यासाठी योजना आखण्यात आली आहे.प्रत्येकाने या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन के व्ही राजेंद्र यांनी केले.यावेळी दालमिया सिमेंट कंपनीला पाठविण्यात येणाऱ्या प्लास्टिक भरलेल्या वाहनांना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी ध्वज दाखवला. यावेळी प्लॅस्टिकला पर्यायी वस्तूंचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते.यावेळी जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे, उपाध्यक्ष अरुण कटा बळे उपस्थित होते.