जुन्या कॅटोंमेंट भाजी मार्केट येथे काही व्यापाऱ्यांनी दिवाळीनिमित्त पूजन करतो, काही भाजीपाला विक्री करतो, असे सांगून प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र प्रशासनाने त्यांना कोणतीच परवानगी देऊ नये अशी मागणी एपीएमसी मधील काही व्यापाऱ्यांनी केली आहे.
गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे. या मागणीचा गांभीर्याने विचार करून कोणत्याच व्यापाऱ्यांना जुने भाजी मार्केट येथे व्यवसाय व पूजन करण्यास परवानगी देऊ नये, नाहीतर आम्ही जोरदार आंदोलन करू असा इशाराही यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
मागील काही महिन्यापासून जुने भाजी मार्केट येथील काही व्यापारी असे उद्योग करून प्रशासनाची व नागरिकांची दिशाभूल करण्यातच धन्यता मानत आहेत. वारंवार त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे आपली मागणी केली आहे. मात्र परवानगी दिल्यास तर ते थेट आपला व्यवसाय तेथे सुरू करून पुन्हा रहदारी आणि इतर व्यवसायांना अडचण निर्माण करणार आहेत.
मागील सहा महिन्यापासून भाजी मार्केट एपीएमसीमध्ये हलविण्यात आले आहे. त्यामुळे तेथील गाळेधारकांना समाधान व्यक्त होत आहे. मात्र काही व्यापारी नको ते उद्योग करून शेतकऱ्यांना व इतर व्यापाऱ्यांना त्रास करण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे त्यांना तातडीने परवानगी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.