पर राज्यातून येऊन बेळगावात केश कर्तनालाय सुरू केलेल्या सर्व दुकानांची परवाने रद्द करा अशी मागणी करत नाभिक समाजाच्या वतीनें निदर्शन करण्यात आली.शहरातील कित्तुर राणी चन्नममा चौकात निदर्शन करून राज्यातील हडपड अप्पाना नाभिक समाजाचा हित साधावे असे निवेदन राज्य सरकारला देण्यात आले.
चन्नमा चौक ते डी सी ऑफिस पर्यंत मोर्चा काढण्यात आला. उत्तर प्रदेश बिहार मधून काही ठेकेदारांनी कामगार आणून कमी किंमतीत केश कर्तनालाये सुरू केली आहेत त्याचा फटका स्थानिक नाभिक समाजाला होत आहे.
शेकडो वर्षा पासून स्थानिक समाज हेअर सलून काढून रोजंदारी करत आलेला आहे बाहेरील सलून कामगारांमुळे स्थानिक न्हावी बेरोजगार होण्याची भीती आहे त्यामुळे बाहेरील दुकान दाराना बेळगावात प्रवेश देऊ नये अशी मागणी करण्यात आली. बेळगाव जिल्ह्यासह आजू बाजुच्या जिल्ह्यातील नाभिक समाजाचे लोक या मोर्चात सहभागी झाले होते.
पर राज्यातील केश कर्तनालये बंद करा अन्यथा नाभिक समाज राज्यभर तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा देत शेकडो नाभिक कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली. डी सी ऑफिस समोर काही काळ ठिय्या मांडला हडपद अप्पाना नाभिक समाजाचे शेकडो जण या मोर्चात सहभागी झाले होते.