Sunday, December 22, 2024

/

वाघामुळे या गावातील लोक झालेत भयभीत

 belgaum

खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्यातील वाघाने भरदिवसा हेम्मडगा गावात प्रवेश करून गोठ्यातील वासरू ओढून नेल्याची घटना घडली आहे.दुलभा मादार यांच्या जनावरच्या गोठ्यातील वासरू वाघाने गोठ्यात प्रवेश करून ओढून नेली.

ही घटना घडल्यावर दुलभा मादार यांनी चरायला सोडलेल्या अन्य जनावरांना आणले आणि गावकऱ्यांना जागरूक केले.या घटनेमुळे तेथील जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे.गावात वन्यप्राणी प्रवेश करत असल्यामुळे लोक घाबरत असून याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

हेम्मडगा परिसरातील लोक भीतीच्या छायेखाली असून वन खात्याने याकडे लक्ष देऊन समस्या सोडवण्याची मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.