हलगा गावच्या तीन मुलींनी मैसूर येथील दसरा स्पोर्ट्स मध्ये चमक दाखवली आहे. त्यांनी एकाच खेळाच्या प्रकारात तीन पदकांची कमाई करीत आपल्या गावचं नाव उज्वल केलं आहे.
मैसूर मध्ये काल गुरुवारी झालेल्या दसरा स्पोर्ट्स मध्ये वेटलिफ्टिंग खेळात विविध गटात दोन सुवर्ण पदके तर एक कांस्य पदकाची कमाई केली आहे.राष्ट्रीय खेळात गोल्ड मेडल मिळवलेली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये कौतुक केलेल्या अक्षता कामती हिने 75 किलो वजन गटात सुवर्ण पदक मिळवले आहे. या शिवाय पवित्रा जयवंत वासोजी हिने 59 किलो वजन गटात सुवर्ण पदक तर पूजा यल्लप्पा संताजी हिने 55 किलो वजन गटात कांस्य पदक अशी एकाच गावच्या मुलींनी दसरा स्पोर्ट्स मध्ये तीन पदकांची कमाई केली आहे.
नॅशनल वेतलिफ्टर अक्षता आणि पवित्रा हिला प्रशिक्षक श्यामला शेट्टी आणि विरुपला यांचे तर पूजा संताजी हिला प्रशिक्षक मालशेट्टी यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.दसरा स्पोर्ट्स मध्ये वेटलिफ्टिंग प्रकारात घवघवीत यश संपादन केलेल्या तिन्ही मुली हलगा गावातील शेतकरी कुटुंबातील आहेत त्यामुळे तिघींचेही कौतुक होत आहे.
हलग्या सारख्या छोट्याश्या गावातून अलीकडच्या काळात राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवणाऱ्या वेटलिफ्टर मुली समोर आल्या आहेत अश्याना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.