भ्रष्टाचाराच्या विळाख्यात अडकलेले जिल्हा शिक्षणाधिकारी ए बी पुंडलिक यांची दुसऱ्यांदा रजा का मंजूर झाली याबाबत सी ई ओ राजेंद्र यांनी सभागृहाला माहिती देणे टाळले आहे.पहिल्यांदा रजेची मागणी केली असता रजा नामंजूर केलेल्या सी ई ओ यांनी 18 तारखेची बैठक केवळ एक दिवसांवर असताना दुसऱ्यांदा दिलेला रजेचा का अर्ज मंजूर केला याचे कारण विचारले असता कार्यनिर्वाहक अधिकारी राजेंद्र यांनी कारण देणे टाळत एक प्रकारे शिक्षणाधिकारी ए बी पुंडलिक यांना ‘अभय’ देण्याचा प्रयत्न केला की काय?असा प्रश्न उपस्थित होत आहे.
18 ऑक्टोबरच्या बैठकी अगोदर 14 ते 25 पर्यंत रोजी बारा दिवसांची रजा पुंडलिक यांनी मागितली होती त्याला
सध्या पुरग्रस्तांचे मदत्त कार्य सुरू आहे त्यामुळे आपल्याला रजा देता येत नाही असे कारण पुढे करत सीईओ यांनी रजा नाकारली होती मात्र गुरुवारी रजा मंजूर केली होती. त्यामुळे शुक्रवारी झालेल्या बैठकीत शिक्षणाधिकारी पुंडलिक यांच्या रजेचा मुद्दा गाजला.
पुंडलिक यांच्यावर भ्रष्टाचाराचे मोठे आरोप आहेत त्यांच्या अनेक प्रकरणांची चौकशी सुरू आहे ते सभागृहाला उत्तरदेय असे असताना पहिल्यांदा नाकारून दुसऱ्यांदा रजा का मंजूर केली याचे कारण सभागृहात स्पष्ट करा अशी गोरल यांनी बैठकीत केली त्यावर सी ई ओ यांनी रजेचे कारण व अधिकाऱ्याची वैयक्तिक समस्या जाहीर रित्या सांगू शकत नाही असे स्पष्टीकरण दिले. मात्र सगळ्या प्रकरणांची उच्च स्तरीय चौकशी सुरू आहे राज्य सरकारच्या मुख्य सचिवांना देखील पत्र लिहून सगळी माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले.
मागच्या अनेक बैठकी मधून शिक्षण आणि स्थायी समिती अध्यक्ष रमेश गोरल यांच्यासह अन्य सदस्यांनी खराब सायकलींचे वितरण, शिक्षकांच्या बेकायदेशीर बदल्या अनेक शिक्षण संस्थांना दिलेल्या वादग्रस्त परवानग्या आणि अन्य विषयावरून पुंडलीक यांना धारेवर धरले होते.यावेळी नीट माहितीही पुंडलिक यांना देता आली नव्हती.पुढील बैठकीत सविस्तर माहिती देतो असे पुंडलिक यांनी बैठकीत सांगितले होते.पुंडलिक यांच्या कारभाराबद्दल सभागृहाने पत्र लिहून तक्रार केली होती.त्यामध्ये भ्रष्टाचार आणि अन्य विषय मांडले होते.त्याची दखल घेऊन सीईओ नी अपर शिक्षण आयुक्तांना पुंडलिक यांची चौकशी करण्यासंबंधी पत्र लिहिले आहे.
बूट वितरणात देखील सावळा गोंधळ झाला असून त्यालाही पुंडलिक जबाबदार आहेत असे सदस्यांचे मत आहे.त्यामुळे पुंडलिक यांना सगळे प्रकरण अंगलट येण्याची शक्यता आहे.एकूण 90 पैकी 64 सदस्यांनी पुंडलिक यांच्या विरोधात चौकशीची मोहीम उघडली असून या प्रकरणाना कुणाचे अभय मिळत आहे याचीच चर्चा सभागृहात रंगली होती.