गांधीनगर येथील भाजी मार्केटला उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. सुरू असलेले बांधकाम थांबविण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला असून यामुळे आता या भाजीमार्केट बद्दल पुन्हा उलटसुलट चर्चा ऐकावयास मिळत आहे. बुडाकडून कोणतीच परवानगी न घेता बांधकामाला सुरुवात करण्यात आले होते. त्यामुळे न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
अनेक व्यापाऱ्यांकडून रक्कम घेऊन राष्ट्रीय महामार्ग शेजारीच गांधीनगर येथे भाजीमार्केटची उभारणी करण्याचे काम सुरू होते. मात्र योग्य परवानी न घेता या इमारतीच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. त्यामुळे त्या विरोधात काही जणांनी खटला दाखल केला होता. न्यायालयाच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिल्याने या भाजी मार्केटला सध्याला तरी स्थगिती देण्यात आली आहे.
गांधीनगर येथील भाजी मार्केट 1 एकर 30 गुंठ्यांमध्ये उभे करण्यात येत आहे. यामध्ये एकूण 150 गाळ्यांची इमारत उभी करण्याचे काम सुरू होते. काही व्यापाऱ्यांकडून रक्कम घेऊन या मार्केटची उभारणी करण्यात येत होते. मात्र योग्य त्या परवानग्या न घेता काम सुरू करण्यात आल्याने उच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली आहे.
महानगरपालिकेकडून काहीशी परवानगी घेऊन बांधकाम कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र बुडा कडून लागणारी परवानगी घेण्यात आली नव्हती. याबाबत उच्च न्यायालयातील खंडपीठाकडे याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयातील दिवाणी न्यायालयामध्ये हा खटला सुरू आहे. त्याठिकाणी बेकायदेशीर काम सुरू असल्याचे याचिकाकर्त्यांचे वकील अर्जुन खोत यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन न्यायालयाने या भाजीमार्केट बांधकामाला स्थगिती दिली आहे.