मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा हे बेळगावात सकाळी मॉर्निंग वॉक करताना त्यांना पोलीस दलातील श्वानाने सॅल्युट केला.ते पाहून येडीयुरप्पा यांनी त्याच्या जवळ जावून त्याला प्रतिसाद दिला.सध्या सोशल मीडियावर याचा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत.
मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा हे बुधवारी सकाळी शासकीय विश्राम धामात होते त्यावेळी सकाळी मॉर्निंग वॉक करत असतेवेळी पोलीस दलातील सोनी नावाच्या श्वानाने सॅल्युट दिला आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जवळ जात सोनीला प्रतिसाद दिला.
मंत्री बी. एस.येडीयुरप्पा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाण्यासाठी मंगळवारी बेळगावात दाखल झाले .त्यांनी शासकीय विश्रामगृहात मुक्काम केला होता.बुधवारी सकाळी त्यांनी शासकीय विश्रामगृह आवारात मॉर्निंग वॉक घेतला त्यावेळी तेथे बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस दलातील सोनी या श्वानाने त्यांना सॅल्युट दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील जवळ जात या मुक्या जनावराला प्रतिसाद दिला.यावेळी मुख्यमंत्र्यां सोबत बेळगाव भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.