Monday, January 20, 2025

/

वडगांव भागात दौडीची उत्साही गर्दी

 belgaum

देव, देश, धर्म रक्षणाची प्रेरणा देणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित श्री दुर्गा माता दौडला प्रचंड प्रतिसाद लाभला. आज सहावी दौड खासबाग, भारत नगर, वडगाव आणि जुने बेळगाव भागात हजारो शिवप्रेमींनी भाग घेऊन चैतन्यमय वातावरण निर्माण केले.

परिसरातील नागरिकांनी उत्स्फुर्तपणे दौडीचे स्वागत केले. बसवेश्वर चौक खासबाग येथे दुर्गा माता मंदिर येथून दौडीस प्रारंभ करण्यात आला. माजी नगरसेवक रतन मासेकर, मनोहर हलगेकर रवी साळुंखे यांच्या हस्ते ध्वज चढवून दौडीला प्रारंभ करण्यात आला. आरती करून प्रेरणा मंत्र म्हणून दौडीस सुरवात झाली.

Sixth day doud
पारंपरिक पेहरावात सहभागी झालेले तरुण-तरुणी, बालक, महिला तसेच वृद्धमंडळींचा दौडीत उत्स्फुर्त सहभाग होता. भगवे फेटे, भगवे ध्वज व पताका या मुळे परिसर भगवेमय बनला होता.

शिवकालीन पेहरावात दौडी च्या स्वागत साठी उभे असलेले बालचमू चौका चौकात उभारलेले शिवपुतळे सर्वांचा उत्साह वाढवत होते. विशेष म्हणजे आजच्या वडगावच्या दौडीत फेटेधारी आणि बालगोपाळांची संख्या भरपूर असते. मंगाई मंदिर येथे दौडीचा शेवट करण्यात आला. रवी पाटील, कुमार गडकरी यांच्या हस्ते मंगाई देवी ची आरती करून ध्येयमंत्र म्हणून दौडीची सांगता करण्यात आली.

उद्या ची दौड : ध.संभाजी महाराज चौक ते संयुक्त महाराष्ट्र चौक.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.