राज्यात गळीत हंगामाला अजून सुरुवात झाली. नसली तरी मागील हंगामातील साखर मात्र साखर कारखानदारांची शिल्लक पडली आहे. कोट्यावधी रुपयांचे साखर शिल्लक असून ही साखर विक्री करणे आणि ती सरकारला विकणे देखील कठीण बनले आहे. त्यामुळे कारखानदारांचे धास्ती उघड्यावर असलेल्या साखरेच्या साखरेवर आहे.
मागील वेळी राज्यातील गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पडला. मात्र साखर कारखान्यांना उघड्यावर असलेल्या साखरेची काळजी लागून राहिली आहे. चालू हंगामातील उत्पादित साखरेचे विल्हेवाट कशी करावी हा प्रश्न समोर असतानाच मागील हंगामातील अजून काही साखर कारखान्यांच्या शिल्लक असल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यातील बेळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साखर कारखाने आहेत. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील साखर अजूनही मोठ्या प्रमाणात शिल्लक असून त्यांची विक्री कशी करावी हा प्रश्न साखर कारखानदारांना पडला आहे. बरेच सहकारी साखर कारखाने कर्जाच्या खाईत रूतले आहेत. साखरेची विक्री न झाल्याने शेतकऱ्यांची ऊस बिले देताना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तर कारखानदारांनी बँकांकडून घेतलेले कर्जाची परत फेड करता न आल्याने चांगलीच गोची निर्माण झाली आहे. त्यामुळे साखर कारखानदार यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
सुमारे कोट्यावधी रुपयांची साखर शिल्लक असून ती साखर सांभाळताना मोठी कसरत करावी लागत आहे. मागील वर्षाचा काढण्यात आलेल्या गळीत हंगामातील साखर शिल्लक पडल्याने त्यातच यावर्षी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेकांची चांगलीच नाकी नऊ वाजले आहेत. अशा परिस्थितीत साखर कारखान्यांनी साखर सांभाळून ठेवणे एक मोठा प्रश्न होता. मात्र अजून शिल्लक असलेली साखर विक्री न झाल्याने कारखानदारांना समोरील अडचणी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे थकीत बिले देण्याकडे कारखान त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे शेतकरी संतापले आहेत.