बेळगाव शहरातील व्होलसेल भाजी विक्रेते दुकानदार दलाल यांच्यातील संघर्ष कमी होताना दिसत नाही आहे व्यापार ए पी एम सी मार्केट मध्ये करणाऱ्या शेकडो दलालांनी शेतकऱ्यांनी जुन्या म्हणजे किल्ला कॅटोंमेंट भाजी मार्केट मधील दुकानांत लक्ष्मी पूजन केले आहे.
ए पी एम सी सदस्यांच्या मर्जीतील व्यापाऱ्यांनी किल्ला कॅटोंमेंट मार्केट मध्ये लक्ष्मी पूजनास आक्षेप घेत जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यांच्याकडे तक्रार केली होती.किल्ला मार्केट मध्ये लक्ष्मी पूजन करण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी केली होती मात्र शेतकऱ्यांनी व दलालांनी रविवारी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी किल्ला कॅटोंमेंट मार्केट मध्ये लक्ष्मी पूजन केले होते. यावेळी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता.
रविवारी दुपारी नंतर अनेक मुस्लिम व्यापाऱ्यांनीही लक्ष्मी पूजनात सहभागी होत सामाजिक सौहार्द तेचा देखील संदेश या निमित्ताने दिला आहे. सर्व दलाल जरी ए पी एम सी मध्ये व्यापार करत असतील तरी त्यांची नाळ अजूनही किल्ला कॅटोंमेंट मधल्या मार्केट मध्ये लपली आहे हे दिसून येत आहे.