रमेश जारकीहोळी स्वतःला झालेले कर्ज फेडण्यासाठी भाजपात गेलेत अशी टीका माजी मंत्री आणि यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी केली आहे. बेळगावात पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नांला उत्तर देताना त्यांनी ही टीका केली आहे.
रमेश यांचे मंत्री पद गेल्या पासून रमेश जारकीहोळी आणि सतीश जारकीहोळी या दोन्ही बंधुत जोरदार कलगीतुरा सुरूच आहे.रमेश यांनी स्वता वर भरपूर कर्ज करून घेतलं होतं ते कर्ज फेडण्यासाठीच त्यांनी भाजपात उडी घेतलीय असं सतीश जारकीहोळी यांनी म्हटलंय.
भाजपात जाऊन कर्ज फेडल्या वर ते पुन्हा काँग्रेस मध्ये परततील अशी आशा व्यक्त करीत त्यांनी काँग्रेसने रमेश जारकीहोळी यांच्या वर कोणताच अन्याय केला नाही त्यांना पक्षाने मोठं केलं अनेक पद दिली मात्र त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष त्याग केलाय असेही ते म्हणाले.