रमेश जारकीहोळी यांनी आपल्या मेहुण्यामुळे अधिकार गमावला असा आरोप सतीश जारकीहोळी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.त्यांचा मेहुणा अंबिराव पाटील यांची पाचशे कोटींची प्रॉपर्टी आहे.पण रमेश जारकीहोळी मात्र कर्जात आहेत.मेहुण्यांचे ऐकून आता अधिकारही गमावला.इतिहासात राजे लोकांनी अधिकार गमावला पण इथे रमेश जारकीहोळी यांनी अधिकार गमावला असे सतीश जारकीहोळी म्हणाले.
महाराष्ट्र आणि हरियाणात जनतेने भाजपला धडा शिकवला आहे .मोदींचे राष्ट्रीय मुद्दे या निवडणुकीत चालले नाहीत स्थानिक मुद्दे लक्षात घेऊन जनतेने मतदान केलेलं आहे. हा निकाल भाजपला इशारा देणारा आहे.भाजप सरकारची आर्थिक धोरनाणी या निवडणुकीत त्यांना धडा शिकवला आहे असे देखील सतीश जारकीहोळी म्हणाले.
गोकाक नगरपंचायत,पंचायती येथे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालला आहे.अनेक जण लोकांकडून हप्ते वसूल करतात.अधिकारी देखील हप्ते गोळा करतात.या भ्रष्टाचाराचे पुरावे लवकरच मी माध्यमांना देणार आहे.गोकाक पंचायत सदस्य स्वतः सांगतात की आम्ही पैसे गोळा करून अंबिरावला देतो.लोकप्रतिनिधींनी जनतेवर प्रेम करावे,कुटुंबातील लोकांवर नव्हे असा टोलाही सतीश जारकीहोळी यांनी हाणला.