जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी बेळगाव दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांची भेट घेऊन पुराचा फटका बसलेल्या बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना त्वरित मदत द्या आणि रस्ते तयार करण्यासाठी आणि दुरुस्ती करण्यासाठी निधी मंजूर करा अश्या मागणीचे निवेदन दिले.
मुख्यमंत्री जिल्हा पंचायत सभागृहात बैठकीला जातेवेळी त्यांनी ही भेट घेतली.महिला बाल कल्याण मंत्री शशिकला जोल्ले व आमदार अंजलीताई निंबाळकर या यावेळी उपस्थित होत्या त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणली.
मार्कंडेय नदीला पूर आल्याने कंग्राळी खुर्द अलतगा आंबेवाडी मन्नूर गोजगा उचगावं तुरमुरी बाची बसुरते कोनेवाडी आणि कुद्रेमनी गावांना मोठा फटका बसला आहे या गावातील पिकांचे संपूर्ण नुकसान झाल्याने शेतकऱ्यांला मोठा फटका बसला आहे सरकारच आपल्याला मदत करेल या आशेवर शेतकरी आहेत.शेतातील भात आणि बटाटा पिकाचे पूर्ण नुकसान झाल्याने आंबेवाडी येथील मारुती राक्षे या शेतकऱ्यांने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली.
शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे शेतकरी पुरामुळे खचून गेले आहे आणि ते आत्महत्ये सारखे पुढचे पाऊल उचलत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांचीही पूर स्थितीमुळे खराब अवस्था झाली आहे काही ठिकाणी तर रस्ता वाहून गेला आहे त्यामुळे बस सेवाही ठप्प झाली आहे यासाठी रस्त्यांची दुरुस्ती आणि निर्माणासाठी निधी त्वरित मंजूर करा असे निवेदन सरस्वती पाटील यांनी दिले आहे.