कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य साजिद शेख हे नेहमीच बेळगाव शहरांमध्ये सामाजिक सलोखा जपण्याचे काम करत आलेत कॅम्पमधील शेख कुटुंबियांचा सामाजिक सलोखा जपण्यात महत्त्वाचा वाटा आहे त्याचीच कास धरत साजिद शेख यांनी दुर्गामाता दौड स्वागत केलय.
सलग दुसऱ्या वर्षी त्यांनीकॅम्प भागातल्या काही मुस्लिम बांधवांना सोबत घेऊन त्यांनी केवळ स्वागतच केलं नाही तर दौडीत धावणाऱ्यासाठीअल्पोपहार सोय देखील केली होती. गुरुवारी दुर्गामाता दौड चा पाचवा दिवस होता कॅम्प कॅटोंमेंट भागातून ही दौड जाणार होती स्वामी बेकरी मारुती मंदिराजवळ साजिद शेख यांनी जवळच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती.
दुर्गामाता दौडीचे त्यांनी रांगोळ्या घातल्या होत्या याशिवाय ध्वज धारकांना आणि तलवार धारकांना हार घालून
स्वागत केलं यावेळी घोषणाबाजी झाली 1000 केळी पाणी खडीसाखर आदी अल्पोपहार युवकांना वितरित करण्यात आले.
डॉ राहिला शेख वाहिद शेख इब्राहिम शेख श्री काळे राजेंद्र जवळकर, साबीर शेख प्रकाश माळवे डॉ गौस शेख डॉ समीर शेख महादेव मिरजकर बशीर शेख आदींनी या कार्यात सहभाग घेतला होता