Wednesday, December 25, 2024

/

बस अडकली खड्ड्यात

 belgaum

पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पुलावर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून रस्त्यांचीही दुर्दशा झाली आहे.बेळगाव पणगुत्ती बस देखील एका ठिकाणी रस्ता खचून अर्ध्याहून अधिक बसचा भाग रुतला आहे.

चिक्कलदिंनी सिद्दापूर पुलाजवळ ही बस रस्त्यात रुतली आहे.रस्त्यात अर्ध्याहून अधिक रुतलेली बस काढण्यासाठी राज्य परिवहन खात्याचे कर्मचारी तेथे दाखल झाले असून रुतलेली बस बाहेर काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

बेळगाव जिल्ह्यात काल तुफान पाऊस झाला होता विशेष म्हणजे संकेश्वर भागात तर ढगफुटीच झाली होती त्यामुळे पुन्हा एकदा रस्ते खराब झाले आहेत रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. बेळगाव पणजी बस देखील खड्ड्यात अडकली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.