वनखात्याच्या जागेवर उभारलेल्या राणी चन्नमा युनिव्हर्सिटीला आता भूतरामहट्टीहूनदुसरीकडे स्थलांतर करण्याची वेळ आली आहे.केंद्र सरकारच्या वन सल्लागार समितीने राज्य सरकारने आरक्षित वन जमिनीचे परिवर्तन गायरान जमिनीत केल्याबद्दल कान उपटले आहेत.
178.35एकर आरक्षित वन जमीन राज्य सरकारने 1990 मध्ये राणी चन्नमा युनिव्हर्सिटी उभारण्यासाठी दिली होती.पण केंद्र सरकारने हे जमिनीचे हस्तांतर नियमित करण्यास नकार दिला आहे.2018 मध्ये केंद्र सरकारने राज्य सरकारला वन खात्याच्या जागेच्या बाहेर युनिव्हर्सिटी हलविण्यासाठी निर्वाणीचा इशारा दिला होता.
2018 च्या पदवीदान समारंभाच्यावेळी उप कुलगुरू होसमनी यांनी युनिव्हर्सिटीसाठीच्या जागेसाठी केंद्राची अनुमती मिळाली नसल्याचे सांगितले होते.आता नूतन उपकुलगुरु रामचंद्रगौडा यांनी 207 एकर जागेची मागणी केली आहे.जिल्हाधिकारी बोमनहळ्ळी यांनी बागेवाडी आणि हलगीमर्डी येथे असलेल्या जागेची माहिती घेण्याचे आदेश महसूल अधिकाऱ्यांना दिले आहेत.