पावसामुळे सर्वात व्यवसायावर परिणाम होत असून याचा फटका अनेकांना सहन करावा लागत आहे. अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या खरेदीवरही याचा मोठा परिणाम जाणवत आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची वेळ आणि पाऊस येण्याची वेळही एकच झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
मागील चार ते पाच दिवसांपासून संततधार पावसाने सुरुवात केली आहे. अजून मधून उघडीप देत असले तरी खरेदी करण्यासाठी नागरिक बाहेर पडण्याची आणि पावसाची वेळ एकच होत आहे. आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण असून याचा परिणाम उद्योगांनी व्यवसायावर जाणवत आहे. पावसामुळे घराबाहेर पडण्यास नागरिक धजत नाहीत. पाऊस कधी जातो रे बाबा असेच साऱ्यांच्या तोंडाला ऐकावयास मिळत आहे.
अवघ्या चार दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. वर्षातील सर्वात मोठा सण म्हणून दिवाळीकडे पाहिली जाते. मात्र जोरदार पाऊस असल्याने खरेदीवर मोठा परिणाम जाणवत आहे. आणखी किती दिवस असाच पाऊस पडणार याची भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे पाऊस कधी एकदा जातोय याचीच वाट पाहत आहेत.
संततधार पावसामुळे अनेकांना बाहेर पडणे कठीण बनले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ सजली असली तरी बाजारपेठेत नागरिकच नसल्याने मोठे समस्या निर्माण होत आहे. आणून ठेवलेला माल वाया जाणार अशी भीती व्यापारी व्यक्त केली आहे. पावसामुळे आता तोंडाला आलेले भाग पिके वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे कधी एकदा पाऊस जातो अशी अशा साऱ्यांना लागून राहिली आहे.