कर्नाटक राज्योत्सव आणि काळा दिनाच्या पाश्वभूमीवर बेळगाव शहर परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.गुरुवारी पोलीस आयुक्त बी एस लोकेशकुमार यांनी पोलीस परेड मैदानावर पोलिसांना कर्नाटक राज्योत्सव व मराठी बांधवांच्या वतीनं पाळण्यात येणाऱ्या काळा दिन बंदोबस्त बद्दल मार्गदर्शन केलं.
गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी बंदोबस्त साठी डेप्युट करण्यात आले आहे शहरात ठिकठिकाणी पोलीस वाढल्याचे चित्र दिसत होते.कर्नाटक राज्योत्सवदिनी मिरवणुकीनिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.मिरवणुकीला सिपीएड मैदानावरून प्रारंभ होणार आहे.
राणी चन्नमा सर्कल कडे येणारी वाहने जिनाबकुल इंडस्ट्रीकडून बॉक्साइट रोडवरून कॅम्प मधून खानापूर रोडवर सोडण्यात येतील.खानापूर,गोव्याकडून येणाऱ्या वाहनांना ग्लोब टाकीजकडून कॅम्प मधून बॉक्साइत रोडवर सोडण्यात येणार आहे.
अथणी,चिकोडी,कोल्हापूरहून येणारी वाहने अशोक सर्कल,कानाकदास सर्कल,कॅन्सर हॉस्पिटलमार्गे जुन्या पी बी रोडवरून जिजामाता चौकापर्यंत जातील.सगळ्या बस कोल्हापूर सर्कल ,आर टी ओ सर्कल मार्गे बस स्थानाकाकडे जातील.