रोटरी क्लबने के एल ई च्या रोट्रॅक्ट क्लबच्या सहकार्याने सामाजिक व्यावसायिकता आणि बी प्लॅन स्पर्धेचे आयोजन एम बी ए आणि बी बी ए चे शिक्षण घेणाऱ्या बेळगावातील विद्यार्थ्यांसाठी आयोजन केले होते.अशा तऱ्हेची आगळीवेगळी स्पर्धा बेळगावात प्रथमच आयोजित करण्यात आली होती.
बी प्लॅन स्पर्धेची कल्पना विशाल पट्टणशेट्टी यांची होती.स्पर्धेत सहभागी झालेल्यानी आपल्या व्यावसायिक कौशल्याचा उपयोग करावा आणि व्यवसाय ,पैसा यांचा वापर करून समाज कसा बदलता येईल यासंबंधी शोध घेण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते.
व्यवस्थापनाचे आणि व्यवसायाचे शिक्षण देणाऱ्या एकूण सतरा संस्थांमधील विद्यार्थी पाहिल्यां फेरीतील सहभागी झाले होते.अंतिम फेरीत सात संघ निवडले गेले होते.रोटरी अध्यक्ष जीवन खटाव,महेश भिरनगी,गौरी मांजरेकर यांच्या उपस्थितीत स्पर्धा झाली.अमित कालकुंद्री,अमृतराज भट आणि योगेश कुलकर्णी यांनी अंतिम फेरीचे परीक्षक म्हणून काम पाहिले.