Sunday, November 24, 2024

/

कारवाईच्या सपाट्याने पीडीओमध्ये खळबळ

 belgaum

बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून के वी राजेंद्र यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी कुचकामी आणि भ्रष्टाचारी पिडिओवर कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. या कारवाईमुळे पुऱ्या जिल्ह्याततील पीडीओमध्ये खळबळ माजली आहे. त्यांनी सुरू केलेला बदली आणि निलंबनाचा अवलंब अनेकांना महागात पण पडत असून अनेकांची भंबेरी उडाली आहे.

रुजू झालेल्या महिन्याभरात मुख्य कार्यकारी अधिकारी के वी राजेंद्र यांनी पीडिओना सर्व मूळ जागी बदली करून चांगलाच धक्का दिला. त्यानंतर अनेक पीडिओना निलंबित तर काहींना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. कोणतीही चूक झाल्यास कारणे दाखवा नोटीस हमकास बजावत आहेत. यामुळे भ्रष्टाचारी आणि माजलेल्याची चांगलीच गोची निर्माण झाली आहे.

या कारणामुळे अनेकांना चांगलीच धास्ती लागून राहिली आहे तर काहींनी आपल्या उचापती ही बंद केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या कारवाईच्या सपाटयामुळे अनेकात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काही तालुका पंचायत वरिष्ठ अधिकारीही यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हप्ते खाऊन माजलेल्या काही तालुका पंचायत वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही नावे हिटलिस्टवर आहेत. त्यामुळे त्यांच्याही उरात धडकी भरली असून कोणतेही उचापती करताना सावध पाऊल टाकूनच कारभार सुरु असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. के वी राजेंद्र यांनी जिल्ह्यातील भोंगळ कारभार उघड्यावर पाडून अनेकांना चांगलीच अद्दल घडवली आहे. या कारवाईच्या सपाट्यामुळे मात्र चांगलीच खळबळ माजली आहे.

काही पिडिओनी तर जिल्हा पंचायतीच्या काही कनिष्ठ अधिकाऱ्यांना पकडून आपल्या बदल्या आणि निलंबनाची कारवाई थांबविण्याचा प्रयत्न केला तर काहींनी राजकीय दबाव आणून आपली बदली रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणालाही न जुमानता के वी राजेंद्र यांनी कारवाईचा सपाटा सुरूच ठेवला आहे. या साऱ्या प्रकरणात गुंतलेल्या भ्रष्टाचारी व पीडीओ आणि कुचकामी असणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगलेच भोगावे लागत आहे. अजूनही कारवाई सुरूच असणार आणि यापुढेही ती तशी चालू राहणार का हा प्रश्न कायम आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.