मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाला नागरिक वैतागले आहेत. अशा परिस्थितीत सुगी आली असून हातातोंडाला आलेले पीक वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. काही भागात अजूनही परतीचा पाऊस सुरू असल्याने अनेक भातावर त्याचा परिणाम जाणवत आहे. त्यामुळे पाऊस जाऊदे रे बाबा असे म्हणण्याची वेळ आली आहे.
पावसामुळे बेळगाव परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या पूर परिस्थितीत अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत तर अनेक जण बेघर झाले आहेत. सरकार काही प्रमाणात नुकसान भरपाई देऊन अनेकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रयत्न करीत असतानाच दुसरीकडे पावसाने हैराण करून सोडले आहे. अनेक पिके वाया गेली आहेत. त्यातच शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
पूर परिस्थितीमुळे अनेक शेतात मोठमोठे खड्डे पडले असून त्यामधूनच नाले ही प्रवाहित झाले आहे. सध्या परतीच्या पावसाला जोरदार सुरुवात असल्याचे दिसून येत आहे. जोरदार पडणाऱ्या सरी यामुळे भात पिकाला याचा मोठा फटका बसत आहे. याविषयी अनेकांशी चर्चा केली असता आता सध्या तरी पाऊस नको रे बाबा असे म्हणण्याची वेळ आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या भात पीक पोसवणीला आले असून पावसामुळे पीक वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आणखी काही दिवस पाऊस असाच पडल्यास अनेकांना याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही भागातील भात पीक खाली पडत असून ते वाया जाण्याची भीती नाकारता येत नाही. पाऊस नको रे बाबा असे म्हणण्याची वेळ आली आहे.