नुकत्याच झालेल्या पावसामुळे सर्वत्रच महापूर आला होता. कोंनवाळ गल्लीत ओव्हर फ्लो झाल्याने भांदुर गल्ली रेल्वे फाटकातून पाणी निचरा बंद झाले होते त्यामुळे भांदुर गल्ली रेल्वे फाटक परिसरात पावसाने घरे देखील बुडाली होती. या भागात अनेक घरांची पडझड झाली होती अशा परिस्थितीत कपिलेश्वर ब्रिज खालून थुक पॉलिसीचे काम सुरू करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे याच परिसरात नाला बनण्याची गरज असताना पाईप टाकून पाणी निसर्गाचे काम केल्याने पुन्हा याचा फटका नागरिकांना बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मागील वेळी ही अशाच प्रकारे करण्यात आल्या होत्या मात्र यापैकी कुजल्याने व पाणी व्यवस्थित न गेल्याने अनेक ठिकाणी पाणी घुसून नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता आताही असाच प्रकार सुरू असल्याने संताप व्यक्त होण्यात येत आहे रेल्वे खात्याकडून या कामाला मंजुरी देण्यात आली तरी या कामाकडे कोणाचेच लक्ष नसल्याने पुन्हा योग्य रीतीने काम होत नसल्याचा आरोप होत आहे त्यामुळे याबाबत जरा गांभीर्याने विचार करून आला पण जास्त सोयीचे ठरणार आहे.
रेल्वे ओव्हर ब्रिज खाली घालण्यात येत असलेली पाईपलाईन काढून त्या ठिकाणी नाला करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे मात्र याकडे कोणाचेच लक्ष नसल्याने हे पाईप देखील ब्लॉक होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे याचा प्रशासनाने विचार करून नाला बांधून द्यावा अशी मागणी होत आहे. भांदुर गल्ली रेल्वे ब्रिज खालून घालण्यात येणारी पाईप दोन फुटी आहे जमिनी लेव्हल पासून वर आहे त्यामुळे पावसात पुन्हा ये रे माझ्या मागल्या प्रकार व्हायची शक्यता नाकारता येत नाही.
या आधी रेल्वे लाईन खालून चार फुटी पाईप घालण्यात आली होती आता दोन फुटी पाईप घातली जात आहे हे जर हे काम पूर्ण झाले तर पावसात पुन्हा चॉक अप होऊन या भागात सांडपाणी घुसू शकते त्यामुळे परिस्थितीत प्रशासनाने विचार करून तातडीने हे काम थांबवून या ठिकाणी नाला करावा अशी मागणी होत आहे.