दसऱ्याच्या निमित्ताने पारंपरिक पद्धतीनं काढण्यात येणारी पालखीची सुरुवात चव्हाट गल्लीतून करण्यात आली आहे. ज्योतिर्लिंग देवदादा सासनकाठी आणि नंदी ज्योती कॉलेज मैदानात सीमोल्लंघनासाठी गेल्यावरच बन्नी मोडण्याची परंपरा आहे याचं पालखीची चव्हाट गल्लीतून उत्साहात सुरुवात करण्यात आली.
दुपारी चव्हाट गल्ली येथून जोतिबा सासन काठी नंदी कठल्याचे पूजन करून मिरवणुकीस सुरुवात झाली.सायंकाळी चार वाजता हुतात्मा चौकात शहरातील इतर पालख्या एकत्र येतात मानाचा नंदी कठल्या मिरवणूक मराठी विद्या निकेतन मैदानाकडे सीमोल्लंघन साठी रवाना होते.
गेली कित्येक वर्षे ही पालखी चव्हाट गल्लीतून निघत असते चव्हाट शेट्टी गल्ली खडे बाजार गणपत गल्ली मारुती गल्लीत जात असते तिथून ज्योती कॉलेज मैदानात ही पालखी जाते मग तिथेच सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होतो.नंदी ची सजावट करून विशेष पोशाखा सह युवक पालखीत सहभागी झाले होते.यावेळी देवस्थान पंच कमिटीचे रणजीत चव्हाण पाटील विजय तमुचे परशराम माळी प्रा.आनंद आपटेकर यल्लप्पा मोहिते चव्हाट गल्ली जोतिबा मंदिर पुजारी लक्ष्मण किल्लेकर, सुनील जाधव नागेश नाईक नामदेव नाईक बळीराम राडे जोतिबा किल्लेकर श्रीनाथ पवार प्रभाकर शहापुरकर महादेव किल्लेकर रोहन जाधव जोतिबा चोपडे पंकज किल्लेकर महादेव मुचंडी आदी उपस्थित होते.
मराठी विद्यानिकेतन मैदानावर बेळगावचे वतनदार पाटील पाटील घराण्याकडे असलेल्या पारंपारिक तलवारींचे शस्त्र पूजन चव्हाण पाटील परिवार व देवस्थान मंडळांकडून होते.मराठी विद्या निकेतन मैदान सीमोल्लंघन साठी सज्ज झाले आहे.