कोणीही काहीही सांगितले तरी बेळगाव हे महाराष्ट्राचेच .बेळगाव अन्यायाने कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ आम्ही काळा दिन कर्नाटक राज्यो त्सव दिनी पाळणारच असे महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार मनोहर किणेकर यांनी मराठा मंदिरामध्ये झालेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत ठणकावून सांगितले. कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी काळा दिन पाळणाऱ्यावर पोलिसांचा अहवाल आल्यावर कारवाई करणार असल्याचे विधान केले होते.काळा दिन पाळणे म्हणजे मोठी चूक आहे असेही म्हणाले होते.
गेल्या बासष्ट वर्षांपासून आम्ही अन्यायाने कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ काळा दिन पाळत आलो आहोत.या वर्षीही एक नोव्हेम्बर रोजी आम्ही काळा दिन पाळणारच .मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाचे दर्शन आम्ही घडवूया.केंद्र आणि राज्य सरकार आमच्या मराठी संस्कृतीचे खच्चीकरण करत आहे.महाराष्ट्र ही आमची भूमी आणि बेळगाव हे महाराष्ट्राचेच .मराठी भाषिकांची एकजूट आम्ही दाखवूया असेही मनोहर किणेकर आपल्या भाषणात म्हणाले.
या बैठकीला माजी आमदार अरविंद पाटील,समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर ,रणजित चव्हाण पाटील,एस.एल.चौगले,बी. डी. मोहनगेकर, राजू मरवे,रावजी पाटील आणि कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.
Trending Now